Animal … a tale of bestial extravagance

Credit – Google

When we buy a ticket for any movie we sign up for entering into that creator’s universe where he/she is at the helm of affairs and we as a viewer or audience surrender to his/her creation. The creator is entitled to tell his/her story the way he/she has imagined and through his/her own ways and those ways can be conventional or unconventional. Just because some scenes or a character is not confirming to our established moral standard, we cannot “cancel” or dismiss it as “vulger”, “vile”, “misogynist” and what not.

Any story-teller imagines his world and often takes help from the real world. Look around us, don’t we find “vulgar”, “vile” and “misogynist” people around us?. So If they exist in the real world and mingle around us, what is the harm if the creator is telling their story through his lens and creating his world around that messed up character?.

Sandeep Reddy Vanga’s (Vanga) directorial hindi debut ‘Kabir Singh’ has met with an unprecedented and unfair criticism for honestly telling his story of a skillful surgeon who has some temper issues. During the course of the story the protagonist’s heart gets broken due to the unique Indian social structure and because of that he takes to various drug addictions and goes on to a journey which seems like a punishment to himself and people around him. But oh boy ! the way Vanga has shown that journey on the screen is very difficult for the debutant director to show on the screen. This shows the clarity and convictions the creator has for his creation. During one of such interviews with film critic Anupama Chopra, Vanga went on to say that “They are calling my film as violent, I will show them what exactly violence is in my next film”

And oh boy ! being true to his words, Vanga put himself on metaphorical steroids and pulled something extra-ordinary and unconventional. In ordinary use, animals mean all living beings except humans. ‘Territorial behaviour’ is the core characteristic of most of the animals which basically means a method by which an animal or group of animals, protects its territory from incursions by others of its species.

That territory can be anything from a piece of land to the mating partner. During the initial course of human evolution, our behaviour was also very animalistic i.e. we did not try to hide or control our basic feelings and physical needs. Psychoanalyst Sigmund Freud calls that part of the personality as “id” which is made up of unconscious psychic energy that works to satisfy basic urges, needs and desires. And when the “id” dominates in the large populace then that creates conflict within the society.

Thomas Hobbes, the English Philosopher, in his book ‘Leviathan’ calls such a situation as ‘state of nature’. It is a real or hypothetical condition of human beings before or without political association. In the words of Hobbes, without political association or government, life would be, “solitary, poor, nasty, brutish and short.” i.e. It is a condition or place where there is no law and order, the metaphorical law of the jungle prevails and where “might is always right”.

Vanga in his latest movie which is very aptly titled as ‘Animal’ places his “universe” in such a Hobbesian ‘state-of-nature’ where a similar law of the jungle prevails and alpha males call the shots. Ranvijay Singh (Vijay) played by the dazzling Ranbir Kapoor is the son of Balbir Singh played by the Anil Kapoor who is the delhi based business magnate and heads the generational steel company called “Swastik Steels”. Vijay adores his father but Balbir Singh being a typical workaholic father does not have time for his family or children. This bothers Vijay and he longs for his father’s attention and love.

Vijay does everything from writing letters to his father and distributing chocolates to his classmates on his father’s birthday. But to no avail. Thus this deprivation of fatherly love turns into an obsession and all his activities would go in the direction of impressing his father. In early childhood only he identified his father as his sole ‘territory’ and this unconventional relationship between father and son is the focal point of the movie.

Since childhood Vijay has been a difficult child to grow but he is very sharp and has an unconventional wisdom which many times puts him in trouble. As a primogeniture of the family he understands his role and often takes things in his own hands which often strains his relationship with his father. And one such act makes his father send him away to boarding school. In the opening scene of the movie we are shown that after many years he returns to his family after finishing aerospace engineering and at that point we are able to understand the changed family dynamics but one thing has not changed i.e. the strained father-son relationship.

Amidst that tension Geetanjali played by the Rashmika Mandhana comes to Vijay’s life. In her own engagement ceremony, Vijay reminds her of the role of alpha males and pelvis in the early human evolution and the freedom females had in the early hunting-gathering era to choose their mating partner. So Geetanjali goes against her family wishes and exercises her discretion in her style and as a result their relationship blossoms or “takes off” into a beautiful family.

Vanga has often been accused of treating her female characters badly by showing them as meek and un-argumentative. Here unlike Priti from Kabir Singh, Geetanjali is a feisty woman who fights, slaps him and expresses herself so strongly when she discovers Vijay’s extra-marital sexual profligacy. Also, on many occasions she tries very hard to tame the animalistic tendencies of the protagonist but while trying to do that their relationship strains because of the same already strained father-son relationship.

To make an entire three hours and twenty one minute movie on this father-son relationship is itself a Herculean task and Vanga has brilliantly woven all emotional threads of that relationship and equally brilliantly performed by Ranbir and Anil Kapoor. The role-playing scene which we have seen in the trailer is so brilliantly pulled by the duo that we couldn’t resist ourselves but to applaud the masterful performance of those actors.

From the opening scene to the interval, we were taken to the joy ride and just before ten minutes to the interval the peak action scene begins with an impressive monologue by the national award winning marathi actor Upendra Limaye. The gun fight with a popular marathi song composed by Ajay-Atul makes the crowd erupt in cheers and claps. The gun fight reminds me of the kind of action performed in the famous John Wick’s movies.

When Vijay puts all of his bullets into the bodies of his enemies, the second lot challenges him to the axe-fight which begins with a popular punjabi folk song ‘Arjan Vailley’ which is rooted in the Sikh history. On hearing the song ‘Arjan Vailley’, the crowd erupts again in cheer and claps. The way that whole violent action scene has been choreographed it looked like someone has created a melody out of sheer madness.

It is not only the action where Ranbir Kapoor looked absolutely staggering but in conversational non-action scenes where he was successfully able to show Freudian “id”ish personality traits by his facial expressions and dialogues. People used to call him the unutilised great actor but I refused to believe it on many occasions.

After watching the animal, I am convinced that Ranbir Kapoor was indeed the unutilised actor to his full potential and Vanga deserves full credit for exploiting the genius of a great actor. Also, when Vijay gives that inspiring speech in front of workers in the factory we literally get goosebumps because of his powerful emotive appeal. Such is the calibre of Ranbir Kapoor.

However, everything is not hunky dory with Vanga’s animal. It has replete with many loose plots and extended screenplay. As I said earlier, from the opening scene to the interval, it has been a pure joy ride and Vanga seemed very much in control till the interval. I wish I could say the same thing about the part after the interval. But alas ! Vanga as a loco-pilot of the ‘locomotive’ lost control over the steering and the mighty animal derailed from the track. Had it not happened it could have been arguably one of the best movies made in recent time and could have become the cult classic like some of Quentin Tarantino’s “bloody” movies are in the west but it fell short due to lack of imagination and poor editing skills at the tailend.

By lack of imagination I mean that there are many scenes which require details but it has not been provided. For example Vijay has been shown as a fearless fighter but nowhere he has been shown to practice or work on it. And when Vijay’s distant cousins came to his rescue they were shown firing automatic rifles and guns without any prior gun training. Also, when Vijay goes to a different country to find his arche nemesis, he is shown heavily armed. How did they manage to smuggle those weapons in such a large quantity or did they buy those weapons from that country itself?. From where did they learn all those skills?. All above scenes require detailing unless Vanga wants us to believe that in his universe all alpha males learn those skills in their mother’s womb like Abhimanyu from the Mahabharata. These are small-small things which require imagination and it is only these small things that make your story convincing and believable.

Also, I call Vanga’s “universe” as a lawless Hobbesian ‘state-of-nature’ where the state-of-the-art weapons are used with impunity. When you place your universe in that land of impunity then it becomes very easy to move your story unhindered. When you are murdering a son-in-law of one of the influential businessmen in broad daylight in an investment summit where foreign nationals and probably the media is also present and you want us to believe that no proverbial “kanoon ke lambe hath” came knocking on those murderers’ doors.

By doing that you are trying to snatch the ‘monopoly-on-the-violence’ from the mighty and omnipresent State. Such an impunity makes you creatively lazy. On the other hand, It requires a certain imagination and creativity to place your universe in the web of law of the land. I wonder, how could a man who has pulled arguably one of the best action scenes ever executed in recent times just before the interval by minutely detailing each and every aspect of gun fighting then how could he go on to derail the later part just because of the same lack of detailing and poor editing skills.

In spite of the above shortcomings, Animal is a treat to watch on the big screen especially the part till the interval for its impeccable screenplay, effective emotive appeal accentuated by the equally emotive music and solid performances by all actors including Bobby Deol who played the role of arche nemesis of the Vijay. Thus it makes for a good cinematic experience and violence shown in the movie both in its physical and verbal form should not be taken literally. We must stop burdening every other film-maker who is honestly telling his/her fictional story with our fanciful urges of social & moralistic changes. For that we have other film-makers. We can celebrate and enjoy both if we find it worthy. If you do not like certain types of movies then you have an option of not signing up by not buying the ticket of that movie.

When we think everything is over, in the post credit scene we are told that this animal will soon be visiting some “Animal Park” where some ‘Jurassic-Park’ level bloodbath is expected. But I just hope that Vanga should give up the temptation of playing to the pan-Indian gallery and instead of shortening the proverbial “kanoon ke lambe hath”, he must acknowledge the State’s legitimate ‘monopoly-on-the-violence’ and then work on his imagination and creative skills so that ‘Animal Park’ will be remembered as less of a bestial extravagance and more of a convincing and logical venture of international repute. Will he or will he not? Only time will tell …

आयुष्याच्या प्रवासात भेटलेला … संतोष

साधारण २०१७ चा हा काळ. यूपीएससीची पूर्व परीक्षा नापास झाल्यावर ‘यशदा’ या संस्थेमधून हकालपट्टी झाल्यानंतर मी पुण्याच्या पेठेमधे रहायचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिति बेताची असल्यामूळे या आधी कधीच ‘क्लास’ तर करता आला नव्हताच पण नाशिकही सुटत नव्हते. नाशिकला असल्या पासून पुण्यातील प्रवीण चव्हाण सरांचे खुपदा नाव ऐकले होते. त्यामूळे आता त्यांच्याकडे राज्यशास्त्र या माझ्या वैकल्पिक विषयाचा ‘क्लास’ करता यावा म्हणून पत्रकार भवन पासून जवळच असलेल्या कर्वेरोडवर स्वप्ननगरी सोसायटीमधे एका फ्लॅटमधे रुम भेटली. त्या फ्लॅटवरच सागर नागपुरे नावाचा एक मित्र भेटला. नागपुरेंविषयी सविस्तर नंतर कधीतरी. 

तोपर्यंत यूपीएससी च्या प्रवासात मला कधीही पूर्व परीक्षादेखील पास करता आलेली नव्हती परंतु नागपुरे पेक्षा खुप आधीपासून अभ्यास करत असल्यामूळे मी ‘टेक्निकली’ त्याला सीनियर होतो. आणि यूपीएससी मधे सीनियरला कोणी काही विचारले नाही तरी आपसूकच उत्स्फुर्तपणे मार्गदर्शन करायची वाईट सवय जड़लेली असतेच. मग काय नागपुरे रूममधे त्याचे सामान लावेपर्यंत त्याने का प्रवीण चव्हाण सरांचा क्लास लावला पाहिजे आणि त्याने तसे नाही केले तर २०१८ ची यूपीएससीची तथाकथित ‘बस’ कशी सुटेल हे सगळे एका दमात त्याला सांगून टाकले. मग आम्ही दोघानी सरांचा ‘क्लास’ लावला आणि सरांच्या क्लासजवळच पत्रकार भवनमधे असलेल्या अभ्यासिकेत प्रवेश मिळवला. त्या अभ्यासिकेत थोड़ा वेळ घालवल्यानंतर जेंव्हा पूर्व परीक्षेचे वारे नुकतेच वाहणे चालू झाले होतेच तेंव्हा एक व्यक्ती नवीनच अभ्यासिकेत दिसायला लागला.

त्याचा पेहराव बाकी लोकांसारखा “पारंपरिक” ‘ट्रॅक-पॅंट’ आणि ‘टी-शर्ट’ नसुन इस्त्री केलेले शर्ट-पॅंट. त्यातही ‘शर्ट-इन’ केलेलं आणि त्यावर कदाचित ‘वुडलॅंड’ चे भारदस्त शूज़. चेहरा एकदम ‘क्लीन-शेव्ड’ आणि त्यावर ‘नायक’ सिनेमातील अनिल कपूरने ठेवलेली मिशी आणि चेहऱ्यावर ‘फ्रेम-लेस’ चश्मा. गडी एकदम तड़का-फड़की येणार, एकदा स्थानापण्ण झाले की एखादे २००-३०० पानी पुस्तक संपवल्याशिवाय उठणारच नाही आणि उठला की लगेच त्याच्या दुचाकीवर (जीचे नाव त्याने ‘राधा’ ठेवले होते 😄) बसुन भुर्रर्र निघुन जाणार. त्यामूळे कोणाशी बोलायचा प्रश्नच नाही.  अभ्यासिकेत पूर्व परीक्षेच्या तोंडावर कोणी नवीन आले आणि असे टापटीप राहत असेल तर विद्यार्थ्यांमधे “तो ‘डीवायएसपी’ आहे, सुट्ट्या टाकुन ‘यूपीएससी-प्री’ साठी आला आहे”,  अशी कुजबुज वजा थाप कोणीतरी हमकास मारत असे.

सागर, संतोष आणि मी – गांजवे चौक, नोव्हेंबर २०१८

नंतर जेंव्हा थोड़ी ओळख झाली तेंव्हा कळले की त्याचे नाव संतोष थेटे आहे आणि तो मूळचा बीडचा आहे. आणि तो सुट्टी वग़ैरे टाकून आलेला ‘डीवायएसपी’ नसुन त्याच्या पुर्वीच्या अभ्यासिकेत ‘डिस्कशन’ या गोंडस नावाख़ाली ‘मच्छीबाजार’ भरत असल्याने आणि खुप मित्र झाल्याने उगाच ‘टाइमपास’ होतोय अशी डीसेंबर महीना संपला की सगळ्या विद्यार्थ्यांना होत असलेल्या जाणीवे मूळेच तो आमच्या अभ्यासिकेत आल्याचे कळले. 

मग पुढे संतोषही यूपीएससीच करत असल्याने अभ्यास, पुस्तके, नोट्स आणि अभ्यासासंबंधीची रणनीति यांवर चर्चा झाली. त्याच चर्चेदरम्यान एकदा संतोषने आम्हाला सांगितले की त्याने तीन हजार रुपयामध्ये ‘लर्न फ्रॉम बेस्ट’ नावाची पूर्व परीक्षेची ‘टेस्ट-सिरीज’ लावली आहे. त्याने आम्हाला पटवून सांगितले की कशी ती ‘टेस्ट-सिरीज’ ‘बेस्ट’ आहे, कसे फक्त तीन हजारामधे जवळपास ४० टेस्टस् देतायेत आणि एवढे केले की त्याच्या बाहेरचे काय येणार आहे पेपरला!. तर असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशा आत्मविश्वासात त्याने ठामपणे आम्हाला सांगितले. पण मला मात्र “एवढे केले की त्याच्या बाहेरचे काय येणार आहे पेपरला!” या वरवर दिसणाऱ्या विधानार्थी वाक्यात कुठेतरी प्रश्र्नार्थी वाक्याचा वास आला. त्याला जेंव्हा आम्ही सांगितले की त्या ‘टेस्ट-सिरीज’चा ‘इकॉनॉमी’चा एक पेपर आमचा ‘रूममेट’ बनवतो आणि तो कधीही ‘प्री’ही पास झालेला नाही तेंव्हा मात्र संतोषला फार मोठा धक्का बसला आणि तो फक्त … “OMG ! काय सांगतो ! … It’s horrible”, एवढेच म्हणाला.

सौजन्य – नितीन भाऊ गायधने

हे असले यूपीएससी आणि तीच्या नाना तऱ्हेच्या रणनित्या याचे फार भारी किस्से झाले आहेत आमच्या आयुष्यात. संतोषचा ‘लर्न फ्रॉम बेस्ट’ चा फुगा फुटला म्हणून आम्ही सगळे खूप हसलो त्या दिवशी. तेंव्हापासून जे हर्षचक्र चालू झाले ते आजतागयत सुरूच आहे. संतोष भेटून आता जवळ-जवळ पाच वर्ष पूर्ण झालीत. त्या दरम्यान आम्ही दोघेही पुण्यावरून दिल्ली आणि संतोष ‘बॅक टू पुणे’ असा बरेच खाच-घळगे असलेला प्रवास पूर्ण केला किंवा तसा तो चालूच आहे. 

संतोषचा जन्म बीडचा पण त्याला अहिल्यानगर (अहमदनगर) जवळ असल्याने सगळ्यांना तो नगरचाच असल्याचे सांगतो. बारावी नंतर पहिल्यांदाच ‘रेल्वे’चा प्रवास करून संतोष नाशिक च्या संदीप फाउंडेशनला ‘इंजिनिअरिंग’ करायला आला. संदीप फाउंडेशनचे भव्य ‘इन्फ्रा-स्ट्रक्चर’ पाहून संतोष आणि त्याच्या वडिलांचे डोळेच दिपले. वडिलांचे जास्तच कारण ते सरळ काचेच्या दरवाजालाच जाऊन धडकले आणि मग त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला की … ‘मेरा बेटा इसी कॉलेज मे पढेगा’

बेटा मग तसाच ‘पढला’ जसे बाकी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पढतात. चार वर्ष कसे निघून जातात कळतंही नाही. तसेच काही संतोषचे झाले. त्या चार वर्षांमध्ये संतोष ‘कूल…😎🎸🎸’ म्हणायला तेवढे शिकला मात्र. आणि लग्नामध्ये मुली नाचतात हा एक सांस्कृतिक धक्काही त्याला नाशिकला आल्यानंतर बसला. धक्का कारण त्याने त्याच्या गावी कुठल्याही मुलीला किंवा बाईला लग्नामध्ये नाचतांना कधीही बघितले नव्हते. या जगात असेही काही होवू शकते हे पाहून संतोष फारच अचंबित झाला. तेंव्हा पासूनच कदाचित संतोषचे चक्षु रुंदावले आणि त्याचा या जगाकडे पाहायचा दृष्टिकोनच बदलून गेला असावा.

यूपीएससी ची तयारी करता यावी म्हणून कॉलेज झाल्यावर थेटेंनी थेट पुणे गाठले. लहान पणापासूनच दगड़, धोंडे, गोटे, नदी, ऊन आणि पाऊस ह्यांचे कुतूहल असल्याने कदाचित संतोषने भूगोल हा वैकल्पिक विषय घेतला. पण काही दिवसातच त्याला कळले की फक्त कुतूहल असुन यूपीएससी झेपत नाही. शाळेत वाचलेला भूगोल आणि हा यूपीएससीचा भूगोल ह्यात खूप फरक आहे. मग थेटेंनी माय-मराठी च्या प्रेमापोटी ‘मराठी-साहित्य’ हा विषय निवडला आणि यूपीएससीच्या वाटेवर त्यांचा थोडा जम बसला. 

परंतु यूपीएससी करायची आहे म्हणून पुणे गाठले, अभ्यासिका लावली, पुस्तके विकत घेतली, जो ‘क्लास’ उपलब्ध आहे किंवा आपल्या आधी आलेल्या एखाद्या मित्राने तो लावला म्हणून आपणही तो लावला. पण एवढे करूनही यूपीएससीचा थोडाही गंधपण येईना. असे का होत असेल बरं? 

त्याचे कारण मला आणि थेटेंना खूप वर्ष या यूपीएससीच्या प्रवासात घालवल्यावर कळले. आम्ही दिल्लीला असतांना कितीतरी वेळा त्यावर चर्चा करतांना आमचे डोळे पाणावले. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर झालेला २०२० हा संतोषचा शेवटचा प्रयत्न होता. मला खूप वाटत होते की त्याने हा प्रयत्न ह्या वर्षी करू नये. पुढच्या वर्षी तयारीनिशी परीक्षा द्यावी. पण संतोषला जे आपण चालू केले आहे ते एकदाचे संपवायचे होते. तेंव्हा मला त्याचे म्हणणे पटले नव्हते परंतु आता मी ज्या परिस्थितीत आहे मीही तसेच काहीतरी केले असते. पाच-सहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष यूपीएससी नावाच्या “मृगजळाच्या” मागे धावल्यानंतर जेंव्हा आपण मागे वळून पाहतो तेंव्हा कळतं की आपण एकटेच एका वेगळ्या रस्त्यावर धावतोय, आपण आणि आपले कुटुंब सोडले तर बाकी आख्खे जग खूप पुढे निघून गेले आहे. संतोषने खूप अभ्यास केला त्या वर्षी. कोरोना ‘लॉकडाउन’ मुले एक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक जडत्व सर्वांनाच आले होते. पण मला जेवढे आठवतंय संतोषने मात्र ‘योगा-प्राणायम’ ह्यांचे सहाय्य घेऊन त्या जडत्वार सक्षमपणे मात केली. 

पण पाच-सहा वर्षांच्या अपयशाचे, आई वडील आणि बाकी समाजाच्या अपेक्षांचे ओझे एवढे जड होते की परीक्षेच्या आदल्या रात्री संतोषला एक ‘मिनिट’ सुध्दा झोप लागली नाही. आपले मेंदूचे ‘वायरिंग’ही फार विचित्र असते. नेमके त्याच रात्री आई-वडील, त्यांचा हसरा चेहरा आणि इतर सर्व आशा- आकांशा ह्यांचा जणू संगमच होतो आणि आपण त्या संगमात पार बुडून जातो. झोपायचे रात्री ११-१२ ला असते पण पहाटेचे ४-५ कधी होतात कळतही नाही. आज आपली आपल्यासाठी जगातली सर्वात मोठी लढाई आहे आणि आपण एकही क्षण झोपलो नाहीये या जाणिवेने ‘स्ट्रेस-लेव्हल’ असा ‘शूट’ होतो की आपण पार उध्वस्त झाल्या सारखी ‘फिलिंग’ येते. न झोपताहि संतोष सावरला. त्याने ‘मिल्टन’च्या ‘थर्मस’मधे ‘ब्लॅक’ कॉफी भरली आणि गेला परीक्षेला. पहिला पेपर ‘जनरल-स्टडीज’चा असतो. पण झोप झालेली नसेल तर दुसरा पेपर म्हणजे ‘CSAT’ तुमचा ‘गेम’ करू शकतो. पण संतोष ची ‘बेसिक-ॲप्टिट्युड’ वर पकड आहे हे माहीत होते पण २०१९ च्या प्रयत्नात तो ‘CSAT’च “उडाला” असल्याने चिंता होतीच. जेंव्हा संध्याकाळी संतोष भेटला तेंव्हा त्याला विचारले कसा झाला पेपर? तर तो फक्त “झाले आहे ‘मॅनेज’ …” एवढेच म्हंटला.  

दुसऱ्या दिवशी ‘स्कोअर’ वगैरे चेक केला तर संतोष पहिल्यांदाच शंभरी पार करणार होता. त्यामुळे यावर्षी संतोष ‘मेन्स’ देणार म्हणून आम्ही सगळेच फार उत्सुक होतो. ज्याचा संघर्ष आपण फार जवळून पाहिलेला आहे अश्या प्रत्येकाला त्याच्या यूपीएससीच्या “उतारवयात” सगळ्यांच्याच शुभेच्छा आणि भरपूर सहकार्य लाभते. प्रत्येकाचीच इच्छा असते की कोणीतरी आपल्यापैकी एकानेतरी “ती” “ग्लास-सीलिंग” तोडावी म्हणजे बाकीच्यांचा “ती” अपारदर्शक “ग्लास-सीलिंग” तुटू शकते यावर विश्वास बसतो आणि मग ती तोडल्यानंतर त्याने आपल्यालाही वर्तून हात देऊन वर ओढून घ्यावे अशीच प्रत्येकाची माफक अपेक्षा असते. पण २०१८ पासून यूपीएससी ‘पूर्व-परीक्षे’ने जणू काही ‘जायंट-किलर’चे च रौद्ररूप धारण केले होते. त्याहीवर्षी संतोष पूर्व परीक्षा पास होवू शकला नाही. बघता बघता ६ प्रयत्न संपले. “आता पुढे परत यूपीएससीच्या परीक्षेला बसता येणार नाही”, कुठल्याही विद्यार्थ्यासाठी हा विचारच फार भयंकर आहे.

प्रत्येकाने स्वतःच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या रोमँटिक दिवसांमध्ये स्वतःची ‘आयएएस-आयपीएस’ म्हणून कल्पना केलेली असते. आता ती कल्पना कधीच सत्यात उतरणार नाही, हे कल्पून डोळे पाणावतात, मन गहिवरून येतं. कोणाला तरी पकडुन खूप जोरात ओरडून रडावसं वाटते. त्या दिवशी जो कोणी संतोषला भेटत होता तो प्रत्येक जण संतोषला मिठी मारत होता. ज्याने यूपीएससीचे ३-४ ‘अटेंप्ट’ दिलेले आहेत तोच समजू शकतो “‘अटेंप्ट’ संपणे …” म्हणजे काय नेमके. काहीही न मिळवता दिल्ली सोडणे म्हणजे फार भयंकर कल्पना आहे. ज्या दिवशी आपण यूपीएससीचा अभ्यास करायचा निर्णय घेतला तो दिवस, सुरुवातीचा उत्साह, आत्मविश्वास, झालेल्या चुका, या प्रवासादरम्यान भेटलेले “गुड-समारीटन” असे बरेच काही आपल्या पाणावलेल्या डोळ्यासमोरून अक्षरशः तरळून जातंय. या सगळ्याचा सामना करणे फार कठिण आहे. म्हणूनच या ‘प्रोसेस’मध्ये बरेच जण फार ‘बीटर’ होतात. काही जण कायमचा ‘कॉन्टॅक्ट’ संपुष्टात आणतात. काहीजण तात्पुरता अबोला धरतात. ती वेळच तशी असते काय करणार. कोणालाच दोष देता येत नाही आपले नशीब सोडले तर ! 

संतोषने मात्र तसे काहीच केले नाही. जे झाले ते स्वीकारले आणि दिल्ली मधून रिकाम्या हाताने जाणार नाही काहीतरी घेऊनच जाऊ असा निश्चय करून करून तो पुढे ‘सेबी’, ‘नाबार्ड’ आणि ‘ईपीएफओ’ च्या अभ्यासाला लागला. खूप ‘व्हिडिओ-लेक्चर्स’ पाहिले त्याने. खूप अभ्यास केला. परंतु त्याला दिल्ली रिकाम्या हातानेच सोडावी लागली. त्यावेळेला आमच्या फ्लॅट वर फक्त चेतन सोर्ते होता. तो जेंव्हा संतोषला ‘रेल्वेस्टेशन’ला सोडायला गेला तेंव्हा ते दोघे एकमेकांचा निरोप घेतांना रडकोंडीच आले होते. थोडे नियंत्रण सुटले असते तर कदाचित दोघांचाही बांध फुटला असता. मानवी स्वभाव असाच आहे पहा, फक्त एकत्र राहिल्याने याआधी कितीही काहीही झालेलं असले तरी फक्त एकत्र राहून एवढे घट्ट नाते तयार होते की एकमेकांचा निरोप घेणं फार कठीण होतं. 

आता संतोषने एमपीएससी करायचे ठरवले. एक-दोन विषयाचे ‘क्लास’ लावले. २०२१ च्या पूर्व परीक्षेत ३-४ गुण कमी पडले आणि २०२२ च्या परीक्षेत १.५ गुणांमुळे तो पास होवू शकला नाही. आता मात्र संतोष फार संतापला. त्याने ‘डायरेक्ट’ स्पर्धा-परीक्षा क्षेत्राला राम-राम ठोकला आणि ‘जावा’ या संगणकीय भाषेचा कोर्स करून ‘आयटी’ मध्ये प्रवेश करायचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय त्याने तडीस नेला मात्र. फक्त ६ महिन्यात ‘डबल-डीजीट’चे पॅकेज मिळवले. हे ६ महिने संतोष साठी फार कठीण होते. पेठ सोडून दुसरीकडे कुठेतरी तो राहायला गेला. जवळपास ५-६ महिने तो कोणाशीही जास्त काही बोलला नाही. पैसे वाचावे म्हणून कुठेतरी स्वस्त रूम घेतली त्याने. स्मशान शांतता असलेल्या परिसरात तो रात्री दचकून उठायचा. त्याला वाटायचे कोणीतरी उभे आहे आपल्या रूम मध्ये. कदाचित हे सकाळी ८ ते रात्री ११-१२ पर्यंत दररोज थोडीही विश्रांती न घेता केलेल्या अभ्यासामुळे होत असावे. आपण कधी फोन केला तर एवढेच जाणवत होते की आपला ‘हॅपी-गो-लकी’ संतोष आता फारच सतर्क झाला आहे. कदाचित या स्पर्धा परीक्षेच्या आभासी दूनियेतून बाहेर पडल्यावर, खऱ्या दुनियेत चाचपडतांना बसलेल्या चटक्यांमुळे असे होत असावे.

आता मात्र थेटे स्थिरसावर झाले आहेत. दर महिन्याला पगार जमा होतो. फक्त दोनच दिवस ‘ऑफिस’ बाकी दिवस ‘वर्क-फ्रॉम-होम’. त्यामुळे सतर्क झालेला संतोष आता परत ‘हॅपी-गो-लकी’ ‘मोड’वर आलेला आहे. त्याचा हा सगळा प्रवास पाहून फार छान वाटतं. कारण आमच्यापैकी काहींना लहानपणी फार हुशार वगैरे समजले गेले होते पण नियतीने असे काही वळण घेतले की आमचे मूलभूत रोजगाराचेही वांदे झाले होते किंवा आहेत. स्पर्धा परीक्षेच्या आभासी दूनियेतून बाहेर पडणे सोपे नाहीये. त्यातून संतोष फक्त बाहेर पडला नाही तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी देखील मिळवली. 

त्यामुळे संतोषला दर ३-४ दिवसांनी विचारले की “थेटे काय करताय?”, तर थेटेंचे एकाच उत्तर असते, “अरे खूप ‘विक-विक’ वाटतयं, म्हणून चिकन खातोय रे !”. थेटे आणि चिकन यांचे फारच वेगळे समीकरण आहे. म्हणजे लहानपणी कोंबडी दिसली तरी ह्याच्या तोंडाला पाणी सुटायचे म्हणे आणि आता ह्याला दर २-३ दिवसांनी अशक्तपणा येतो आणि हा चिकन खाऊन सशक्त होतो. जेंव्हा थेटे दिल्ली सोडून पेठेत गेले तेंव्हा त्यांनी एक ‘अनलिमिटेड’ मेस लावली. तिथे तो मला दररोज त्याने काय नाश्ता केलाय त्याचा फोटो पाठवत असे. कधी ‘रेल्वे’मध्ये भेटतं तसले ‘कटलेट’ तर कधी खमंग ढोकळा. “काय सांगू तुला …पोटभर ढोकळा खाल्ला आहे मी आज 😂😂😂” असा त्याचा मेसेज असायचा फोटो खाली. मग बघता बघता “स्लिम-ट्रिम” थेटेंचा कधी “एकनाथ-शिंदे” झाला कळलेच नाही. मीही ‘फुडी’ असल्याने आमच्या खाद्य पदार्थांवरून बरेच विनोद होत असतात. 

फक्त खाद्यपदार्थ नाहीतर आमचे जगातील कुठल्याही विषयावर तासंतास बोलणे होते. म्हणजे असा एकही विषय नाही आम्ही त्यावर बोलत नाही. काल परवाच, थेटे नुकताच प्रदर्शित झालेला ‘12th fail’ हा सिनेमा पाहून आले आणि आवाज ऐकून मी सहज विचारले, “थेटे, काय झालंय, फार उदास दिसताय, काय झालंय?, तर थेटे “आपल्याला यूपीएससीच्या तयारी दरम्यान एखादी श्रध्दा का नाही भेटली” म्हणून नाराज होवून बसले होते 😂😂.

माझा मुख्य परीक्षेचा निकाल येणार असल्याने फार ‘स्ट्रेस’ येतोय सध्या. मग काय संतोषला एक कॉल केला की तो असे काहीतरी बोलतो की आपण आपला ‘स्ट्रेस’ विसरून कुठल्या तरी फालतू-रिकाम्या गोष्टीवर हसत बसतो. आता पण हे लिहिता लिहिता त्याचा कॉल आला. मला म्हणतोय “विशल्या, माझा ‘क’ झाला आहे रे … चालता येईना रे नीट …शेप च बदलला आहे रे माझा … काय करू मी जरा टीप्स देना मला 😂😂”.

संतोष फक्त दुसऱ्याला मित्र म्हणत नाही तो खरचं मैत्री निभावतो. तुम्ही त्याला कधीही काहीही विचारले मागितले तर ‘नाही’ हा शब्द जणू त्याच्या शब्दावलीमधेच नाहीये. ह्यामुळे बऱ्याचवेळा त्याला नुकसान देखील होते. काहीजण ह्याचा गैरफायदाही घेतात. पण संतोषला त्याचा काही फरक पडत नाही. त्याचे यूपीएससीचे स्वप्न पूर्ण झाले नाही तरी तो माझे तेच स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून फार उत्सुक आहे. माझ्या आगामी निकालाची काळजी माझ्यापेक्षा त्यालाच जास्त आहे.

तर असा हा संतोष म्हणजे मनाने राजा माणूस जो या यूपीएससीच्या प्रवासात सुट्ट्या टाकून आलेल्या अनोळखी ‘डीवायएसपी’ पासून कधी तो माझा ज्याला आपण ‘बेस्ट-फ्रेंड’ वगैरे काहीतरी म्हणतो ना … तसा काहीतरी तो झाला आहे. आपण पुरुष मंडळी फारच ‘इमोशनली-चॅलेंज्ड’ असतो. असे भर-भरून कधी कोणा बद्दल फार बोलत नाही. आपल्याला फक्त एकमेकांचे पाय सहज खेचता येतात. पण आज संतोषचा वाढदिवस. म्हणूनच त्याच्यासाठीच हा सगळा त्याच्याच आठवणींना उजाळा देणारा प्रपंच.

संतोष … तुला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! तु अशीच शक्तिमान सारखी गगन भरारी घेत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

शक्तिमान थेटे, नोव्हेंबर २०२०, १९/३६

शेवटी एवढेच म्हणेन … तु नसता ना मित्रा तर आयुष्यात एवढी मजा नसती आली बघ !!

AI : a cognitive revolution 2.0?

SEVERAL years ago, I watched a movie titled Her. It tells the story of a writer Theodore, who uses an artificial intelligence (AI) system named ‘Samantha’ to help him with his work. Eventually, he falls in love with Samantha and goes on to have his heart broken when he gets to know that she is interacting with 8,316 other people and is in love with 641 of them. In the year 2014, I did not take the premise of the movie seriously as it belonged to the science-fiction genre but now in 2023, I realise that the movie was way ahead of its time.

In his book “Sapiens: A Brief History of Humankind,” Harari argues that around 70,000 years ago, there was a significant shift in human history marked by the emergence of complex language and advanced cognitive abilities. Harari calls this development as the “cognitive revolution” which played a crucial role in shaping human intelligence and enabling our species to create more sophisticated tools, communicate effectively, and engage in complex cultural and societal interactions.

So in this essay, we will deep dive into the concept of intelligence, which made human beings – the human beings – the dominant species of this planet. We will be discussing what is intelligence, it’s various types, how human being with the help of their intelligence created something new which is now being refered to as ‘artificial intelligence’ and what exactly is AI, what are its various types and applications and how is it going to shape the future of its creator.

Intelligence is the ability to learn, understand, reason, and solve problems effectively in various situations. While other animals demonstrate intelligence in various ways, the combination of some unique characteristics sets human intelligence apart and contributes to our ability to innovate, adapt, and create intricate societies.

According to the theory of multiple intelligences given by Howard Gardner, psychologist and a professor at Harvard University, there are eight types of intelligences. Logical-Mathematical intelligence is just one amongst those. So Human beings created AI by using their Logical-Mathematical intelligence – through a combination of research, programming, and technology development.

AI is the creation of computer systems that can perform tasks that normally require human intelligence, such as learning from experience, recognizing patterns, and making decisions.

AI can be categorized into three main types :-

  1. Narrow or Weak AI: This type of AI is designed and trained for specific tasks Eg. virtual assistants like Siri, ChatGPT, etc
  2. General or Strong AI: General AI refers to systems that possess human-like intelligence and this level of AI remains theoretical and has not yet been achieved.
  3. Artificial Superintelligence: which refers to an AI that surpasses human intelligence in virtually every aspect and can outperform humans in every domain of cognition. There are debates about its feasibility and potential consequences.

We are witnessing a new global revolution. AI is going to impact everything. One of the Big Tech companies, Amazon is already using AI for not only writing books but also selling them. Marvel is also taking help of AI in creating animations. It is unimaginable what AI is already capable of – writing emails, replying to emails, helping in studies and work. The possibilities are endless.

If AI can do any work better than humans then the fear of losing jobs is genuine. In history, whenever, a new technology was introduced, it has definitely had an impact on the job market. When smartphones were introduced, the jobs of landline telephone operators were all gone. Due to the advent of industrial robots, assembly line workers lost their jobs. But the danger of AI is much bigger than all these technologies for two reasons

One is that, the effect of AI technology will not be limited to a single sector. In fact, it will be seen in every field. It is the first time in history that creative people’s jobs are at risk. No one thought creative jobs like Creative writers and Musicians can also disappear. Using the Google Music Model, in the near future, generating music is going to become so easy, we just need to write what kind of music we want and we will get it.

Second is, AI’s impact is going to be huge and rapid, i.e. it will be so disruptive that whichever sector is impacted by it, millions of jobs will be wiped out. According to the World Economic Forum’s Future of Jobs Report, 2020, by 2025, automation and a new division of labour between humans and machines will disrupt 85 million jobs globally. The ‘dark clouds’ in the form of job losses can be a gloomy reality but there is also a silver lining here

The same WEF’s report also says that this robot revolution will also create 97 million new jobs. According to the WEF, AI is not a ‘job-killer’ but a ‘job-category-killer’. So new jobs would require new skills related to AI. According to one expert in the field, “AI won’t take your job, but a person who knows how to use AI will”. That means, we have to adapt to the new world as soon as possible. Are we ready for it?

As of 2022, India’s literacy rate is only 77%, i.e., 23% of India’s population can neither read nor write. Also, according to the National Sample Survey Report, nearly 60% of Indians can’t copy or move computer files on their computer or mobile. Just imagine how difficult it is to employ such people who do not even have basic computer knowledge. Today, if you want a job, you need to have a basic knowledge of computers. Similarly, in the coming years, AI will become a new standard – that if you want a job, you should have a basic knowledge of AI. Will our students be trained on time in schools and colleges?

We can use AI in the education sector. In fact, Japan has already published a guideline allowing limited use of AI in its school. AI can be used for – reducing the workload of teachers, explaining concepts better, fact checking and also learning English. Its use is not restricted to the education sector only. It can be used in varied sectors.

It can diagnose breast cancer ‘30 times faster’ than human doctors, helps us to decode how animals communicate, to develop chatbots avatars of people’s deceased relatives, preserving their memories and helping, with grief, To prevent invasive fish from colonising rivers and AI as a tool is uniquely positioned to help manage the complex issues surrounding climate change and its impacts on environmental, social and economic systems worldwide.

So basically AI is a tool. Like any tool it can be put to creation or destruction. That depends on the person using it. When put in the hands of flawed humans, can become a weapon. Political propaganda is the most dangerous misuse of technology. In 2016, when the AI was in a nascent stage, Cambridge Analytica used it for manipulating voting behaviour. There is also a sliver of hope, as AI can also be put to good use and using AI some fact-checking websites also busting fake news and political propaganda.

Also, with the advent of AI based technologies such as deepfakes, voice cloning tools, etc many fraudsters even mimicking specific accents of users and creating fake videos. According to one survey, 83% of victims of fraud are Indians. So we need to spread awareness against such scamsters and fraudsters and be ready to harness the onslaught of opportunities provided by the combination of AI and its subset – Machine Learning.

In the upcoming years, AI will become a crucial element that immensely contributes to the growth and development of India. The future seems bright and hopeful for AI in India. With proper strategies and policy support, India can establish itself as a leader in AI on the global stage. NITI Aayog’s ‘National strategy on AI’, International Centre for Transformative AI to conduct advanced research and RAISE 2020 – Responsible AI for Social Empowerment – are the steps in the right direction.

Until now, whatever we have discussed the Weak AI which is behind the screen now. But what if it comes out of the screen and interacts with us in the physical world. The prospect of Samantha visiting Theodore in person in the sequel of Her movie cannot be ruled out. This level of AI remains theoretical and has not yet been achieved. But just imagine, what will happen if these robots become so intelligent that they are better than humans at every task. Are we about to witness ‘Cognitive Revolution 2.0’?

In one of the Science fiction comedy movies ‘Idiocracy’, the protagonist wakes up after some 500 years and finds himself in a society where evolution has made humanity stupid because people no longer have to be intelligent and physically fit to survive due to the benefits of technology. This is akin to the phenomenon of ‘reverse-evolution’. Instances like children finding it difficult to write with pencil due to excessive use of technology, some societies stopped reciting multiplication tables because they have a calculator at their disposal, force us to ponder and ask, are we on a ‘downward trend’ as far as skills are concerned which we acquired during the course of evolution?. If this downward trend continues wouldn’t it be a cake walk for an evolved ‘Artificial Intelligence’ to win over a species with ‘Natural Stupidity’?

That is why Elon Musk warns us against AI and states that “ The danger of AI is much greater than the danger of nuclear warheads.” Also, Steve Woznick, Apple’s co-founder, says that, AI poses a dramatic risk to society unless there is a proper oversight. So Giving heed to such experts, All nations of the world should come together and create a global policy on the responsible, limited and ethical use of AI.

In the realm of technology, the juxtaposition of ‘Kip’ – the AI powered robot from Christopher Nolan’s movie ‘Interstellar’ – and ‘David’ – 8th version of an advanced robot from Ridley Scott’s space anthology ‘Prometheus’ – serves as a poignant reminder of the potential consequences that arise from our creations. The power to shape the narrative of AI rests in our hands – by drawing inspiration from both Kip’s devotion and David’s caution, we can navigate this uncharted territory with wisdom and foresight.

In the end, will AI turn into a Kip who remains fiercely loyal to its master and helped him save humanity, or a David who is hellbent on annihilating even the last shred of humanity far from the planet Earth?

ONLY TIME WILL TELL …

बॉर्न अ क्राईम

लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२१

इ. स. १६५२ मधे डच ईस्ट इंडिया कंपनीच्या नौका आफ्रीका खंडाच्या अतिशय दक्षिणेकडील ‘केप ऑफ गुड होप’ च्या बंदराला येऊन धड़कल्या आणि तेथील मुळ रहिवाशांबरोबर युद्ध छेडुन आजुबाजुचा भूप्रदेश कब्जात घेऊन व्यापारी वसाहत स्थापन केली. ही केप कॉलनी म्हणजेच आताचे केप टाउन शहर. पुढे विविध कायदे करुन तेथील मुळ रहिवाशांना गुलाम केले गेले. पुढे १८०६ मधे, ब्रिटिशांनी केप वसाहत कब्जात घेतली तेंव्हा डचांचे वंशज पुढे उत्तरेकडे सरकले आणि तेथे त्यांनी स्वतःची नवीन भाषा, संस्कृति, रुढी, परंपरा विकसित केल्या आणि पुढे ते  आफ्रीकानर्स – आफ्रीकेची स्वतंत्र श्वेत जमात – म्हणुन ओळखले जाऊ लागले. ब्रिटिशांनी कागदोपत्री गुलामगिरी संपुष्टात आणली परंतु पुढे सोने आणि हिऱ्यांची खाण सापडल्याने, तिथे असंख्य मानवी हातांची गरज असल्याने व्यवहारात गुलामगिरी चालूच राहिली.

तेंव्हाचा आफ्रीकन समाज झुलु, झोसा, स्वाना, सोथो, वेंडा, डेबेले, पेडी, इ. जमातींमधे विभागला होता. त्यातील झुलु आणि झोसा या प्रबळ जमाती. झुलु लोक हे पारंपरिक अभिमानी लढवय्ये. जेंव्हा वसाहतवादी फौजांनी घूसखोरी केली तेंव्हा झुलु जमात पारंपरिक भाले आणि ढाली घेऊन त्यांच्यावर तुटून पडले. पण समोर आधुनिक बंदुका असल्याने त्यांची हज़ारोंनी कत्तल झाली पण तरिही त्यांनी लढणे काय थांबवले नाही. साउथ आफ्रीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झूमा हे झुलुच. नुकतेच त्यांना कोर्टाचा अनादर केल्यामुळे तुरुंगवास झाला व त्यानंतर तेथे त्यांच्या समर्थकांचा उद्रेक होऊन प्रचंड हिंसाचार झाला. झोसा जमातीला स्वतःच्या विचारीपणावर गर्व. सुरुवातीला त्यांनीही घूसखोरांविरुद्ध सशस्त्र लढा दिला पण लवकरच त्यांना त्याचा फोलपणा कळुन आला. त्यानंतर त्यांनी मवाळ भूमिका घेतली. शत्रुला समजुन घ्यायचे असेल तर त्याची भाषा शिकली पाहिजे हा विचार करुन त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली. साउथ आफ्रीकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला हे झोसाच. इंग्रजी शिकल्यामुळे त्यांना सरकारशी वाटाघाटी करता आल्या. पण त्याचा काही विशेष फायदा झाला नाही. ना जहाल, ना मवाळ असा कोणताही दृष्टिकोण कामी आला नाही. कुठल्याही समस्येचे निराकरण दृष्टिपथात नसेल तर एकमेकांविरुद्ध आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. झुलु आणि झोसा यांमधे असेच घडले. मुळात कोणाचाही दोष नसतांना, दोन्ही जमातींनी अपयशयाचे खापर एकमेकांवर फोडले. 

पुढे ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य मावळत असतांना ‘यूनियन ऑफ आफ्रीके’वर आफ्रीकानर्स जमातीने स्वतःच्या पूर्वजांची विरासत असल्याचा दावा करुन हक्क सांगितला आणि ‘अपार्थाईड’ला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले. अपार्थाईड हा मुळचा आफ्रीकानर्सच्या ‘आफ्रीकांस’ भाषेतील शब्द. ज्याला इंग्रजी मधे ‘अपार्टनेस’ असे म्हणता येईल. मग लोकांची व्हाईट, इंडीयन, कलर्ड आणि ब्लॅक अशी वांशिक वर्गवारी करुन, कोणी कुठे राहायचे, कोणी कोणाशी लैंगिक संबंध ठेवायचे, कोणी कोणाशी लग्न करायचे, इ. सर्व कायद्याने ठरवुन पद्धतशीरपणे वांशिक विलगीकरण केले गेले. व्हाइट आणि कलर्ड यांमधे बऱ्याचवेळा गोंधळ होत असल्याने, त्याचे निदान म्हणुन ‘पेन्सिल टेस्ट’ घेतली गेली. व्यक्तीच्या केसांमधे पेन्सिल अडकवायची, ती केसांमधे अडकली (कुरळे केस असतील) तर तो व्यक्ती कलर्ड आणि ती घसरुन खाली पडली तर व्हाईट. चीनी लोकांवर ब्लॅक असा शिक्का मारला गेला आणि जपान या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन तेथुन दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स आणि लक्झरी कार मागवता याव्यात म्हणुनच जपानी लोकांवर व्हाईट असा शिक्का मारला गेला. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांच्या सुदैवाने चीनी व जपानी लोकांची संख्या कमी होती नाहीतर त्यांच्या नाकी नऊ आले असते त्या दोहोंमधील फरक ओळखण्यात. पुढे १९२७ च्या अनैतिकता कायद्याने (Immorality Act, 1927) श्वेत आणि अश्वेत यांच्या मिलनातुन प्राप्त होणारे अपत्य बेक़ायदेशीर ठरवले गेले.

ट्रेवर नोआह हे असेच एक बेक़ायदेशीर अपत्य. ‘बॉर्न अ क्राइम’ हे ट्रेवर नोआह यांचे मेम्वॉर किंवा स्मृतिचित्र. ट्रेवर नोआह हे प्रसिद्ध हास्यकलाकर आणि सध्या इम्मी पुरस्कार प्राप्त ‘द डेली शो’ चे सादरकर्ते आहेत. त्यांच्या जीवनकथेतून त्या काळातील साऊथ आफ्रीकन आयुष्याची कल्पना करता येते.

ट्रेवरचा जन्म झोसा जमातीतील कृष्णवर्णीय आई पेट्रेशिया आणि गौरवर्णीय वडिल रॉबर्ट यांच्यापोटी झाला. वर्णभेदी राज्यात सर्वात मोठा गुन्हा कुठला असेल तर तो आंतरवंशीय लैंगिक संबंध ठेवणे. जो ट्रेवरच्या पालकांनी केला होता. त्यांनी रीतसर लग्न वगैरे केले नाही आणि ते शक्यही नव्हते. पेट्रेशियाला तिच्या कुटुंबात भरपूर सदस्य असूनही लहानपणापासूनच एकटे वाटत असल्याने तिला स्वतःचे कोणीतरी हवे होते जो तिच्यावर बिनशर्त प्रेम करेल. म्हणून आयुष्याच्या प्रवाहात भेटलेल्या रॉबर्टकडे तिने मुलाची मागणी केली. सुरुवातीला नाही, नको असे म्हणत शेवटी त्याने तिची इच्छा पूर्ण केली आणि १९८४ साली ट्रेवर नावाच्या गुन्ह्याचा जन्म झाला. जन्माला येणारे कुठलेही मूल त्याच्या जन्मदात्यांच्या प्रेमाचे प्रतीक असते पण त्या काळच्या वर्णभेदी राज्यात, ट्रेवर त्याच्या जन्मदात्यांच्या गुन्हेगारिचा ‘कलर्ड’ पुरावाच होता.

आता ‘गुन्हा’ घडलाच आहे तर तो लपवला पाहीजे. ‘गुन्हा’ खुप लहान असल्याने त्याला कुठल्याही कापडात गुंडाळून कुठेही नेता येई. या लहानग्या ‘गुन्ह्या’ला खायची प्रचंड आवड. त्यामुळे तो ‘किरकोळ’ ‘गुन्हा’ लवकरच ‘गंभीर’ झाला आणि  कुठल्याही कापडात मावेनासा झाला. पेट्रेशिया स्वतः श्वेत परिसरात लपून-छपुन राहत असल्याने ट्रेवरला त्याच्या आजीकडे ‘सोवेतो’ला धाडले गेले.

१९३० च्या दशकात, विलगिकरणाचे धोरण राबवतांना, जोहान्सबर्गमधील सर्व कृष्णवर्णीय लोकांना बाहेर काढुन दुसरीकडे जवळच वसवले गेले. जवळच कारण, गोऱ्या साहेबांचे त्यांच्या सेवे शिवाय पान हालत नसे. जवळपास १० लाख लोकसंख्या असलेला पण कुठल्याही प्राथमिक सोयी-सुविधा नसलेला प्रदेश म्हणजे सोवेतो. पोलिसांना धाड टाकायला सुलभ व्हावे किंवा शहराची कमी वेळात टाळेबंदी करता यावी म्हणुन यायला एक आणि जायल एक अशे दोनच रस्ते. आणि कधी बंड वगैरे केलेच कोणी तर बॉम्ब टाकून लगेच ‘खेळ’ संपवता यावा अशीच संपूर्ण रचना. 

अपार्थाईडपूर्वी, ज्या कोणा कृष्णवर्णीय व्यक्तीला औपचारिक शिक्षण मिळाले ते त्यांना युरोपियन ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या मदतीमुळेच प्राप्त झाले होते. त्या शाळांमध्ये ते इंग्रजी भाषा, इंग्रजी साहित्य, औषधशास्त्र, कायदे, इ. विषय शिकले. त्यामुळे आश्चर्य वाटायला नको पण त्या काळातील वर्णद्वेषी राज्याचा विरोध करणारे नेल्सन मंडेला असोत किंवा स्टीव्ह बायको हे मिशनरी शाळांमध्येच शिकले होते. याप्रकारचे उच्च शिक्षण प्राप्त झालेल्या व्यक्तीला नैसर्गिकरीत्या स्वातंत्र्याची ओढ आपसूकच लागते.  

आणि ती लागू नये म्हणुन वर्णद्वेषी राज्याने ‘बंटू एज्युकेशन ॲक्ट, १९५३’ संमत करून अमलात आणला. त्याकाळी कृष्णवर्णीय लोकांना विलगिकरण करून जी जागा दिली होती त्या जागेला बंटूस्थान असे म्हणत. म्हणून हा कायदा त्या नावाने ओळखला जातो. त्या बंटू शाळांमध्ये फक्त किमान आकडेमोड आणि शेती हेच शिषय शिकवले जात. त्यातही, बटाटे कसे मोजावे, लाकूड कसे तोडावे, जमिनीची नांगरणी कशी करावी. विज्ञान नाही, इतिहास नाही आणि नागरिकताच नाही तर नागरिकशास्त्र वगैरेचा तर प्रश्नच नाही. सर्व मिशनरी शाळांना नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले गेले. सरकारचे म्हणणे होते की, ह्या लोकांना जर जमिनीवर खड्डेच खणायचे असतील तर ह्यांना लॅटिन शिकवून काय फायदा? लेखकाने ब्रिटिश वर्णद्वेष आणि आफ्रीकानर्सचा वर्णद्वेष यांमधला मूलभूत फरक फार मजेशीर पद्धतीने मांडला आहे. ब्रिटिशांचे म्हणणे होते कि, जर एखादे माकड माणसासारखे चालत, बोलत असेल तर कदाचित ते माकड नसुन माणुसच होय. याउलट, आफ्रीकानर्सचे म्हणणे होते की, मुळात माकडाची आणि माणसाची बरोबरी करून त्यांच्या हातात पुस्तक द्यायचेच कशाला. म्हणजे ब्रिटिशांच्या वर्णद्वेशाच्या ‘योजनेमधे’ उभ्या वांशिक गतिशीलतेला काही प्रमाणात मान्यता होती. जी आफ्रीकानर्सच्या वर्णद्वेशात अजीबात नव्हती. 

त्यामूळे ट्रेवर चे आजोबा शाळेत फक्त, बे एक बे, बे दुणे चार…. हा हा हा’ एवढेच शिकले. त्याच्या आईचे नशीब चांगले  म्हणुन तीच्या आत्याच्या खेडेगावी मिशनरी शाळा सुरु राहिल्या आणि तीला इंग्रजी आणि बाकी जीवनावश्यक शिक्षण घेता आले. पण बाकी हजारो लोकांच्या शिक्षणाभावी पिढ्याच्या पिढ्या गरिबीच्या सांस्कृतिक दृष्टचक्रात अडकून पडल्या. त्यामुळे, त्या गरीब कुटुंबातील कोणी एक जण शिकला, कुठेतरी नोकरीला लागला, चार पैसे कमवायला लागला तर त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडायची. लेखकाची आई त्या जबाबदारिला  ‘ब्लॅक टॅक्स’ असे म्हणते. तो टॅक्स ट्रेवरला भरावा लागू नये म्हणुन त्याच्या आईने खुप कष्ट केले, त्याविषयी लेखकाने खुप कौतुकाने लिहीले आहे. पिढ्यानपिढ्या परिस्थिति सुधारत नसल्यामुळे, बरेच लोक स्वप्न पाहणे सोडुन देतात. तसेच काहीसे ट्रेवरच्या नातेवाईकांचे झाले होते. त्यामुळे ते पेट्रेशियाला म्हणत, ‘तु हे सगळे का करतेयेस?, ट्रेवर जर हा ‘घेटो’ सोडून कुठे जाणारच नसेल तर त्याला घेटोबाहेरील जग दाखवुन काय फायदा?. त्यावर, पेट्रेशिया म्हणायची, ‘मला माहित आहे, ट्रेवरला घेटोसोडुन जाता येणार नाही, पण, मला ट्रेवरला याची जाणीव करुन द्यायची आहे की, घेटो म्हणजे जग नव्हे, तेवढे जरी मी करु शकले तरी माझे आयुष्य सार्थकी लागेल’.

आंतरराष्ट्रीय दबावामुळे, वर्णभेदी धोरणे काही प्रमाणात शिथिल व्हायला लागल्यावर तेथील प्रतिष्ठित खाजगी शाळांनी सर्व वर्णांसाठी स्वतःचे दरवाज़े उघडले. त्यामूळे, ट्रेवरला चांगले शिक्षण, इंग्रजी तसेच बाकी इतर भाषांवर प्रभुत्व मिळवता आले. या शिक्षणामुळे आणि भाषेवर मिळवलेल्या प्रभुत्वामुळेच लेखक आयुष्यात प्रगती करु शकले, असे ते प्रांजळपणे कबुल करतात. लेखक स्वतः कलर्ड असल्याने त्यांची विलक्षण परिस्थिति अतिशय उत्तमपणे मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. एका आडव्या रेषेच्या दोन्ही टोकाला आपण अनुक्रमे श्वेत आणि कृष्ण वर्णीय असे मानले आणि कलर्ड लोकांना त्या रेषेच्या अगदी मध्यबिंदूवर ठेवले. तर काही कलर्ड लोकांचे शारिरीक ‘फिनोटिपिकल’ वैशिष्ट्ये श्वेत टोकाकडे झुकतात आणि काहींचे कृष्ण वर्णीय टोकाकडे झुकतात. श्वेत म्हणजेच गौरवर्णीय लोकांचे राज्य असल्याने त्यांना बरेच विशेषाधिकार त्यामूळे सर्व कलर्ड लोकांना मनापासून श्वेत टोकाकडेच झुकायचे आहे. म्हणजेच त्यांचा ‘रेफरन्स ग्रुप’च श्वेत आहेत. त्यामूळे बरेच कलर्ड लोक कृष्णवर्णीय लोकांचा तिरस्कार करणार. त्यांच्यासाठी ‘व्हाईट इज ब्यूटीफुल’ आहे कारण तसे मानल्याने ते त्यांच्या ‘रेफरन्स ग्रुप’ जवळ जातात. पण त्यांच्या दुर्दैवाने नेल्सन मंडेला नावाचा एक इसम येतो आणि त्या आडव्या रेषेवरील दोन्ही टोकच बदलून टाकतो. म्हणजे आता गौरवर्णीय राज्य नसून कृष्णवर्णीय राज्य झाले आहे. आता ‘ब्लॅक इज ब्यूटीफुल’ झाले आहे. त्यामूळे बहुतेक  कलर्ड लोकांची आता पंचायत झाली आहे. 

‘द शॉर्ट हिस्ट्री ऑफ नियरली एवरीथिंग’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक बिल ब्रायसन यांचे मानवी शरीरासंबंधी डोक्यावरच्या केसांपासून तर पायाच्या बोटांपर्यंत इतंभूत अशी माहिती देणारे ‘द बॉडी’ हे नवीन पुस्तक वर्षभरापुर्वी प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकासाठी संशोधन करत असताना  ब्रायसन यांना एका प्राध्यापक-शल्यचिकित्सकाने प्रयोगासाठी ठेवलेल्या शवातून जखमेवरची खपली काढावी तसे त्वचेचा वरचा स्तर अलगद असा काढुन दाखवला. एखाद मिली मीटर जाडी असेल त्याची. आधुनिक वैद्यकशास्त्राने त्वचेचे एपिडर्मिस, डर्मिस व सबक्युटिस असे तीन प्रमुख स्तर सांगितले आहेत. त्यापैकी एपिडर्मिस या सर्वात बाहेरच्या स्तरात रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या मेलॅनोसाइटस् या प्रकारच्या पेशी असतात. त्या पेशीच त्वचेचा रंग ठरवतात. हा काढलेला स्तर म्हणजे एपिडर्मिसचं. म्हणजे हा इवलासा जवळपास पारदर्शकच असलेला स्तर मानवाच्या त्वचेचा रंग ठरवतो. म्हणजे मानवी शरीराचा सर्वात वरचा एखाद मिली मीटरचा स्तर सोडला तर बाकी हाडा-मांसाचे शरीर असलेल्या माणसामाणसांत तीळमात्रही फरक नाही. म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या तरी मानवांमध्ये त्यांना वेगळे करेल अशी कुठलीही रेषा नाही. मुळात मानवी जन्म हाच एक प्राकृतिक अपघात असतांना मानवाने मानवाच्याच बाह्य  स्वरूपातील शारीरिक रचनेचा एवढा मोठा बाऊ करून त्यांना वेगळे करेल अशी काल्पनिक रेषा का ओढली असावी? 

त्या ‘का’ चे उत्तर आपल्याला युरोपियन देशांच्या वसाहतवादी धोरणांमध्ये मिळते. विविध युरोपियन देश जेंव्हा एका मागून एक प्रदेश पादाक्रांत करत होते तेंव्हा तेथील मूळ निवासी लोकांबरोबर त्यांचा संपर्क आला. पुढे या ‘श्वेत’ युरोपियन लोकांनी तेथील मूळ निवासी लोकांवर ‘बिगर-श्वेत’ असा शिक्का मारला आणि मानवजात श्वेत आणि बिगर श्वेत या दोन गटांमध्ये विभागली गेली. पुढे अठरव्या शतकात काही  मानववंशशास्त्रज्ञांनी आधीच अस्तित्वात असलेल्या वंश या संकल्पनेला शास्त्रीय रंग देण्याचा प्रयत्न केला आणि व्हाईट (कॉकेशियन), ब्लॅक (नेग्रॉइड) आणि येल्लो (मंगोलियन) असे मानवाचे या तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. पुढे मग काळाच्या ओघात ‘व्हाईट रेस’ श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ असे सांगण्यात आले. आणि मग या ‘शास्त्रीय वंशवादाचा’ वापर वसाहतवादी राज्यकर्त्यांनी त्यांच्या मतलबीसाठी अतिशय धूर्तपणे करून घेतला. ‘जंगल-बुक’ या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी ‘व्हाईट मॅन्स बर्डन’ नावाचा सिद्धांत मांडला आणि श्र्वेतेतर लोकांना ‘सुसंस्कृत’ करण्याचा ‘उद्दात्त’ भार श्र्वेतांवर टाकला.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वंश ही संकल्पना किती भंपक आहे हे पुराव्यानिशी सांगता येते. उत्क्रांतीच्या प्रवाहात, जे काही ‘फिनोटिपिकल’ बदल होऊन त्वचेचा रंग, केसांचा प्रकार, चेहऱ्याची विशिष्ट वैशिष्टे आणि डोक्याचा आकार या स्वरूपात जी काही विविधता सध्या अस्तित्वात आहे ती केवळ ठराविक भौगोलिक भूप्रदेश, विशिष्ट प्रकारचे हवामान आणि या सगळ्यांना मानवी शरीराने दाखवलेली प्रतिक्रिया यामुळेच आहे.

समाजशास्त्रज्ञांच्या मते, काही लोक भिन्न संस्कृती असलेल्या इतर लोकांना एका ठराविक वंशीय किंवा जातीय साच्यात बसवतात. ते वर्गीकरण कुठल्याही शास्त्रोस्त्र पद्धतीने केलेले नसते. उलट, कुठलेही सामाजिक स्तरिकरण त्या-त्या समाजातील वर्चस्ववादी वर्गाच्या सोयींनुसार केलेले असते. तेंव्हा वंश आणि जात हे केवळ वैचारिक रचना (Ideological constructs) आहेत. आणि वेळोवेळी काही ठराविक वर्चस्ववादी वर्गाचे प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी, कृत्रिम भेदभाव आणि असमानता निर्माण करण्यासाठीच वंश आणि जात या वैचारिक रचनेचा शस्त्र म्हणून वापर झाला आहे किंवा अजूनही सूक्ष्म पद्धतीने केला जात आहेच. 

ट्रेवर नोआह यांचे हे पुस्तक ‘कमिंग ऑफ एज’ मेम्वॉर असल्याने त्यांनी यात जन्म, मग बालपण सरून वयात येण्याचा मोठा काळ, त्यादरम्यान आईने केलेले संस्कार त्याबरोबरच वर्णभेदाच्या, विषारी पुरुषत्वच्या वाईट आठवणींचा धांडोळा घेतला आहे. त्याचबरोबर दररोजच्या आयुष्यात घडणाऱ्या सामान्य घटना अतीशय विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत. आणि त्या मांडत असतांना त्यांनी प्रत्येकवेळेस वर्णवर्चस्ववादाच्या तकलादू इमल्याला अतिशय तर्कशुद्धपणे जमीनदोस्त केले आहे.

द वॉर दॅट मेड रॉ

लोकसत्ता, २४ जुलै २०२१

सन १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये, भारताने ३२५० सैनिक गमावले, १०४७ घायाळ झाले आणि जवळपास ४००० सैनिकांना चीन ने बंदी बनवले. चीन आपल्यावर कधीच हल्ला करणार नाही अशा आदर्शवादी आविर्भावात असताना चीन ने अचानक हल्ला केला. भारतीय सैनिकांनी जमेल तसा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण चीन च्या उस्फुर्त हल्ल्या पुढे त्यांचा फार काळ निभाव लागला नाही आणि त्यांना माघार घ्यावी लागली. दरम्यान, चीन ने जवळपास ४३,००० वर्ग कि.मी. जमीन काबीज केली आणि स्वतःच एकतर्फी युद्धविराम घोषित केला. या सर्व घडामोडी जवळपास महिनाभरातच पार पडल्या आणि भारताकडे बळही नाही आणि गुप्तचर माहितीही नाही असे जगजाहीर झाले.

त्यानंतर, १९६८ साली ‘रॉ’ अर्थात ‘रिसर्च अँड अनालिसिस विंग’ या भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना झाली. ‘द वॉर दॅट मेड रॉ’ हे अनुशा नंदकुमार आणि संदीप साकेत यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यात रॉ ची स्थापना का व कशी करण्यात आली, त्या प्रक्रियेत कोणाची भूमिका महत्वाची होती आणि पुढे १९७१ च्या भारत-पाक युद्धात रॉ ने कशी माहिती गोळा केली हे अतिशय रंजक पद्धतीने या लेखिका-लेखक द्वयीने मांडले आहे. अनुशा आणि संदीप हे दोघे ही सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे पटकथा आणि दिग्दर्शन या क्षेत्रातले पदवीधर आहेत. या दोघांचे हे पहिले च पुस्तक आहे.

भारताची सर्वात जुनी गुप्तचर संस्था म्हणजे ‘इंटेलिजन्स ब्युरो’ (आय.बी.). तिची स्थापना १८८७ साली लंडन मध्ये झाली. स्वातंत्र्यानंतर आय.बी. चा परदेशी गुप्तचर माहिती विभाग जवळपास अस्तित्वातच नव्हता किंवा कदाचित तेवढा प्रभावी नव्हता म्हणून भारताला परदेशी गुप्तचर माहितीसाठी मित्रत्व असलेल्या काही पाश्चिमात्य देशांवर अवलंबून राहावे लागत असे. त्याचा परिणाम म्हणजे, त्या परकीय संस्थांकडुन ‘चीन आपल्यावर कधीच हल्ला करणार नाही’ ह्या आपल्या आदर्शवादी विचारात अजूनच खतपाणी घातले गेले आणि जेंव्हा चीन च्या हातून पराभव स्वीकारावा लागला तेंव्हा, तेंव्हाच्या जागतिक  भू-राजकीय पटलावर भारताची पुरती नाचक्की झाली.     

त्या पराभवातून भारताने पुढील धडे घेतले

१) युद्धकाळात देशाच्या गुप्तचर संस्थांना संवेदनशील गुप्तचर माहितीसाठी परकीय गुप्तचर संस्थांवर अवलंबून राहता येणार नाही.

२) देशाच्या संरक्षणासाठी गुप्तचर माहिती हि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याबाबतीत लवकरच आत्मनिर्भर व्हावे लागेल. 

३) फक्त युद्धकाळात च नव्हे तर शांततेच्या काळातही शेजारी राष्ट्रांवर नजर ठेवावी लागेल.

संघर्ष हा मानवी स्थायीभाव आहे. आणि ज्याप्रमाणे मानव संघर्ष करतो त्याचप्रमाणे मानवांचा समूह असलेले राष्ट्र देखील संघर्ष करते. त्यामुळे या जागतिक राजकारणात वर्चस्व ठेवायचे असेल तर संवेदनशील गुप्तचर माहिती मिळवली पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे विश्वासू पी.एन. हक्सर ह्यांनी १९६८ साली, रामेश्वर नाथ काव (आर.एन. काव) यांना तातडीच्या बैठकीसाठी बोलावणे धाडले.

गुप्तहेर म्हंटले कि सूटबूट-टाय परिधान करून शत्रूशी दोन हात करणारा आणि मद्यालयात गेला कि लगेच तेथील मदनिके कडून ‘मार्टिनी’ चा प्याला घेणारा जेम्स बॉण्ड आपल्याला आठवतो. पण आर.एन. काव हे, भडक जेम्स बॉण्ड पेक्षा एकदम उलट म्हणजे नेहमी पडद्याआडून काम पाहणारे, कधीही मद्यपान न करणारे आणि ‘कुठल्याही गुप्तहेरासाठी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्याची ओळख जगासमोर येणे’ असे ठामपणे मानणारे आणि त्या प्रमाणेच आचरण करणारे सर्वसाधारण व्यक्तिमत्व होते.

आर. एन. काव

आर.एन. काव यांचा जन्म १९१८ साली बनारस येथे एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. १९४० साली त्यांची इंडियन इंपिरियल पोलीस (आताच्या, भारतीय पोलीस) सेवेत निवड झाली आणि स्वातंत्र्यानंतर त्यांची बदली आय.बी. मध्ये झाली. हक्सर यांनी काव यांनाच का बोलावले तर आय.बी. मध्ये असतांना काव ह्यांनी ‘काश्मीर-प्रिंसेस’ ह्या प्रकरणात केलेले विशेष काम. ‘काश्मीर-प्रिंसेस’ ची कहाणी खूपच रंजक आहे, त्याबद्दल पुस्तक़ात सविस्तार वाचायला मिळते.

‘रॉ’ ची जेंव्हा स्थापना झाली तेंव्हा – त्याविषयीचे कुठलेही लेखी पुरावे ठेवायचे नाहीत, सगळे डोक्यात ठेवायचे आणि जे काय ‘रिपोर्टींग’ करायचे आहे ते थेट पंतप्रधानांना करायचे, असा काव यांचा निर्णय होता. इंदिरा गांधी यांनी काव यांना संपूर्ण स्वायतत्ता दिली होती, हे महत्वाचे. त्या ज़ोरावर काव यांनी विश्वासु सहकायांचा चमू बांधला. जो पुढे ‘द काव-बॉईज’ म्हणून प्रसिद्ध पावला.

काव यांनी स्वतः वर खूप मोठी जबाबदारी ओढवून घेतली होती. ‘Knowledge is power’, हि म्हण त्यांना सत्यात उतरवायची होती. त्यांना ते करायचे होते जे आय.बी. ला करता आले नाही. त्यासाठी त्यांना ‘एजेन्ट’ आणि जमिनीवरून माहिती देणाऱ्या ‘इन्फॉर्मेर्स’ चे जाळे विणायचे होते. कुठल्याही मशीन पेक्षा काव यांचा विश्वास HUMINT वर म्हणजे ‘हुमन इंटेलिजन्स’ वर होता. रॉ ने संभाव्य ‘एजेन्ट’ कसे शोधले? त्यांना संपूर्ण प्रशिक्षण देऊन दुसऱ्या देशात कसे पाठवले? याबद्दल लेखकांनी सविस्तर लिहिले आहे. काश्मीर बेदी ची कहाणी वाचताना आपल्याला मेघना गुलझार यांच्या ‘राज़ी’ सिनेमातील सेहमत खान आठवल्या शिवाय राहत नाही.

सलमान रश्दी यांनी त्यांच्या ‘शेम’ या कादंबरीत १९७१ पूर्वी च्या पाकिस्तानचे वर्णन, त्याचा उल्लेख न करता, ‘दोन पंख असलेला पण धड नसलेला विलक्षण असा पक्षी, जो त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या जमिनीमुळे विभक्त आहे आणि फक्त ‘देवामुळे’ एकमेकांशी जोडला गेला आहे’, असे केले आहे. ते दोन पंख म्हणजे पश्चिम-पाकिस्तान आणि पूर्व-पाकिस्तान. अगोदरपासूनच त्यांच्या मध्ये विचारसरणी, संस्कृती आणि भाषे मुळे मोठे अंतर होते आणि त्यात १९४८ साली, पाकिस्तान सरकारने, उर्दूला अधिकृत राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला आणि पूर्व पाकिस्तान ने बंडाचा नारा दिला. पुढे पश्चिम पाकिस्तान च्या अनैतिक राज्यकर्त्यांच्या सापत्न वागणुकीमुळे ते आधीचे मोठे अंतर कधीच भरू शकले नाही आणि उलट पूर्व  पाकिस्तान ने शेख मुजीबूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली   स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. ते दडपण्यासाठी पाकिस्तान ने ‘ऑपरेशन सर्चलाईट’ सुरु केले आणि पूर्व  पाकिस्तान मध्ये मृत्यू चा तांडव चालू झाला आणि लाखो शरणार्थ्यांच्या लोंढ्यांच्या रुपात त्याची झळ भारताला लागल्या शिवाय राहणार नव्हती. 

इंदिरा गांधी ह्यांनी तातडीची बैठक बोलावली. फिल्ड-मार्शल सॅम माणेकशॉ ह्यांनी आपण जर आता युद्धासाठी उतरलो तर आपली १०० टक्के हार होईल असे म्हणून युद्ध तयारीसाठी वेळ आणि संपूर्ण सहकार्य मागितले. त्यांनतर तब्बल ७ महिन्यांनी पाकिस्तान ने भारतावर आक्रमण केले आणि तेंव्हाच भारताने युद्ध घोषणा केली. मग ते ७ महिने भारताने नेमके काय केले?. पाकिस्तान ने स्वतः आक्रमण केले कि भारताने त्यास आक्रमण करण्यास भाग पाडले? आणि तसे भारताने का केले असावे? आणि त्यात रॉ ची काय भूमिका होती?

जेंव्हा पारंपरिक युद्ध शक्य नव्हते तेंव्हा रॉ ने ‘हुमन इंटेलिजन्स’, ‘कॉम्युनिकेशन इंटेलिजन्स’ आणि जे काही शक्य आहे ते सगळे वापरून आवश्यक माहिती कशी गोळा केली आणि त्याचा आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स ने कसा अचूक वापर केला. ‘मुक्ती बाहिनी’ च्या निर्मितीमागे रॉ ची काय योजना  होती?. संयुक्त राष्ट्र संघाची युद्धविरामाची टांगती तलवार डोक्यावर असतांना रॉ ने ‘सायकॉलॉजिकल वॉरफेयर’ चा वापर करून पाकिस्तानी सैनिकांना शरण येण्यास कसे भाग पाडले आणि इंदिरा गांधी यांच्या मुसद्दीपणामुळे भारताने अमेरिका-ब्रिटन यांच्या बरोबरचे युद्ध कसे टाळले?. पूर्व पाकिस्तानात, पाकिस्तानी सैनिक शरण तर आले पण शेख मुजीबूर रेहमान तिकडे पश्चिम पाकिस्तानात तुरुंगात होते. पाकिस्तानची युद्धात हार म्हणजे रेहमान यांचा मृत्यू अटळ असताना, भारताने त्यांना कसे काय सुखरूप तेथून काढले? आणि त्यात रॉ ने नेमकी काय शक्कल लढवली? 

अशा अनेक रंजक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात वाचायला मिळतात. हे पुस्तक  एकुण  १६ प्रकरणांमध्ये विभागले आहे. प्रत्येक प्रकरणाला स्वतंत्र असे शीर्षक आहे. वाचकाच्या मनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे वाचनाच्या प्रवाहात मिळत जातात त्यावरून लेखकांनी संशोधनावर केलेली मेहनत दिसून येते. कुठेही भरकटल्या सारखे अजिबात वाटत नाही. लेखन शैलीची विशेष बाब म्हणजे, लेखिका-लेखक द्वयीने ‘फ्लॅशबॅक-नैरेटिव’ पद्धतीचा केलेला चपखल वापर – म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना पडद्यावर चालू आहे जी सर्वपरिचित आहे, त्याची वाचकाला एकदा ओळख करून दिली  कि ते पडद्यामागे जातात आणि त्यामागील कथानक त्याच्या पार्श्वभूमी सकट अक्षरशः जिवंत करतात.

गुप्तहेराचे आयुष्य म्हणजे फक्त माहिती गोळा करणे आणि स्वतः बद्दल ची माहिती बाहेर येऊ न देणे. काव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ह्या हेरगिरीच्या साध्या नियमाप्रमाणे च व्यतीत केले. काव यांनी एक स्वप्न पहिले आणि आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या गुप्तचर संस्थेच्या बळकटीकरणासाठी लावले. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताच्या हेरगिरीचे पितामह असे म्हंटले जाते.

Renaissance State – A book review

MAHARASHTRA, when we hear this word, the image of sword-wielding Shivaji Maharaj, riding on a horse comes to our mind. This beloved King of Maharashtra, though born in the medieval era, had a distinctively modern outlook and unparalleled compassion. There is no doubt that he deserves a lion’s share in the history of Maharashtra. And rightly so, he got its due recognition in many historical works written by many eminent historians. The newly released book ‘Renaissance State’ by Girish Kuber continues with that tradition and at the same time goes beyond the Maharaj and also tries to tell the untold story from ancient times to the present of this juggernaut called “Maha-Rashtra”.

At the outset, the author clears that this is not an academic study and rather looks at the state’s history through the lens of a journalist. The book starts with an anecdote about Shri. Madhu Dandavate, which left the reader surprised and there Mr Kuber deftly let us enter into the realm of history. The history of Maharashtra, through the numerous examples, the author have us believe that, is replete with paradoxes and contradictions. And there we realise, OMG! we never thought through this.

The history of the region situated at south-of-the-Vindhyas begins with the Satavahanas. It was the first Maharashtrian dynasty which had its capital at Pratishthan (Paithan). The Gautamiputra Satkarni was the most successful king of the dynasty. The author compares him with Shivaji Maharaj. Through the tumultuous eras of Vakatakas to the Chalukyas and then the Yadavas, we enter into the politically dark phase of Maharashtra and yet it shows the spiritual high and gives rise to the much-celebrated ‘Maharashtra Dharma’.

It is this dharma that guided the Shivaji Maharaj’s ‘Hindavi Swarajya’ which is the first ‘indigenous’ state the region had witnessed since the time of Gautamiputra Satakarni. Though the term ‘secularism’ had its origin in the modern times, Shivaji practised true secularism in the medieval age and also lived by the modern dictum that justice should not only be given, it should also be seen to be given. In return, the commoners supported all of his endeavours. The author compares this unique act of Shivaji – of preparing the common man for a bigger struggle – that with the act of Mahatma Gandhi of empowering the common man for the freedom struggle.

Mahatma Gandhi who successfully led the freedom struggle and got us independence, got his political Guru from the land of Maharashtra in the form of Gopal Krishna Gokhale. At this point, Mr Kuber, characteristically shakes our collective pride only to remind us that, sadly, it is also the land of Mahatma’s murderer i.e. Nathuram Godse. It is these contradictions and paradoxes that keep us engaged throughout the book and makes us ponder

Apart from commonly known personalities, the book also features many interesting figures. Also, he gives compelling reasons and examples and establishes that why maharashtra is the cerebral capital of the country. For me, this thought provoking part, where he discussed most of social and political thoughts through various towering personalities and some controversial ones, is the soul of the book.

This book is replete with many known and unknown personalities who played their part in the making of maharashtra. It is a Herculean task to capture the overwhelming history of Maharashtra, from the Satavahanas to the present MVA Sarkar in just 232 pages (Kindle edition). So it seems the author being mindful of that just touched some aspects of major historical events and few minor incidences he observed from distance. So those who have some sense of history of maharashtra would know most of the things but those who are new to this territory would be amazed to read about it. It is needless to say, readers will definitely get critical perspective about some already known events.

However, it is still difficult task to compile this mammoth length of history in just 232 pages. But readers of Loksatta know about Mr Kuber’s subtle brevity. And here also being true to his characteristic breezy style, his writing runs throughout the book like a knife through butter which makes this an engaging read.

And at the end when we finish the book we realise that the same pattern of paradoxes and contradictions is still playing around us. It has always been there. It is just that we needed a lens of history to look through it. Mr Girish Kuber’s ‘Renaissance State’ has successfully provided that lens and that is why it will be a book-to-be-referred-to for many years to come.

एकमेवाद्वितीय इरफान !

‘अभिनेता इरफान खानचं मुंबईत निधन’ ही बातमी वाचली आणि अचानक डोळे पाणावले. आपल्या आयुष्यात असे खूप कमी वेळा होतं, एखाद्या व्यक्तीला आपण कधी आयुष्यात भेटलोही नसतो, त्याचा आपल्याला कधी  सहवासही लाभलेला नसतो पण तरीही त्याच्या निधनाच्या बातमीने मन गहिवरुन येतं. ती व्यक्ती यापुढे आपल्याला परत कुठेच दिसणार नाही हे कल्पून मन काय माहित का पण फार अस्वस्थ होतं.

“सॉरी, रिचार्ज खतम हो गया है इसिलिये चूप हुं, क्या करूं, आप के साथ भी ऐसा होता होगा ना?, गर्लफ्रेंड को ‘आय लव्ह यू’ बोलना है और रिचार्ज खतम, अब क्या करे?, कबुतर के गले में बांध कर चिठ्ठी भेजोगे?…”, असे म्हणत २००५ मध्ये इरफान सामान्य घराघरांमध्ये ‘छोटा रिचार्ज वाला’ म्हणून लोकप्रिय झाला. काय माहित का पण त्याची ती जाहिरात पाहून आपसूकच हसू येई आणि कितीही वेळा ती पाहत रहाविशी वाटे. त्याच्या आधीही तो दूरदर्शनवरील ‘चंद्रकांता’ ह्या मालिकेत ‘पंडितजी’ म्हणून लोकप्रिय होताच हे नंतर कळले. पण आमच्या पिढीला तो तेंव्हाच ‘हच’ आणि आताचे ‘व्होडाफोन’ साठी केलेल्या जाहिरातीतूनच पहिल्यांदा भेटला.

साहेबजादे इरफान अली खान हा अभिनय कलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (एन. एस. डी.) चा विद्यार्थी. सडपातळ अंगकाठी, बेटकुळ्यारहित दंड, रंग सावळा, डोक्यावर समोरून ‘स्टायलिश’ कोंबडा न होणारे केस, भावदर्शी टपोरे डोळे असा त्याचा एकंदरीत सर्वसामान्य अवतार. थोडक्यात तो  ‘बॉलिवूड’ मध्ये त्या काळात हिंदी सिनेमाचा नायक होण्यासाठी आवश्यक असलेले कुठलेही पारंपरिक शारीरिक मानकं किंवा गुणधर्म नसलेला, अगदी सामान्य म्हणजे आपल्या सारखा दिसणारा आणि अगदी आपल्या सारखे बोलणारा होता.

१९९१ च्या उदारीकरनानंतर हळूहळू तीन खानांचे राज्य प्रस्थापित झाले आणि हिंदी सिनेमाचे ‘बॉलिवूडायजेशन’ होत गेले. त्याचा परिणाम म्हणजे, काही अपवाद वगळता, हिंदी सिनेमा म्हणजे “दिल”, “जिगर”, “जान” आणि टुकार ‘मारधाड’ एवढेच काय ते समीकरण झाले. १९९८ साली रामगोपाल वर्मा दिग्दर्शित, अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला लिखित ‘सत्या’ हा सिनेमा आला आणि त्याने जणू ह्या ‘बॉलिवूडायजेशन’ ला काही प्रमाणात छेद दिला. त्याचा परिणाम म्हणजे, प्रचलित बॉलिवूड मध्ये नायक म्हणून न शोभणारे परंतु असामान्य अभिनय प्रतिभा असलेले, मनोज वाजपेयी, इरफान खान ह्यांच्या सारख्या कलाकारांसाठी वाट मोकळी झाली.

आणि जेंव्हा वाट मोकळी झाली, तेंव्हा बरेच लेखक आणि दिग्दर्शक ह्यांनी प्रचलित ‘ट्रेण्ड’ ला न जुमानता नवीन मातीतल्या गोष्टी सांगावयास सुरुवात केली. त्यातलाच एक म्हणजे तिग्मांशू धुलिया. तिग्मांशू तसा इरफान चा एन. एस. डी पासूनच मित्र. तो ‘हासिल’ साठी नकारात्मक भूमिकेसाठी एका अभिनेत्याच्या शोधात होता. इकडे इरफान तब्बल १० वर्ष दूरदर्शन वर मालिका करून वैतागला होता आणि कायमचा अभिनय सोडून देण्याच्या तयारीत होता. त्याच दरम्यान इरफान ने तिग्मांशू ला सहज विचारून पाहिले, “मैं करूं क्या वो रोल?”, त्यावर तिग्मांशू गमतीत म्हणाला, “आमा, तुम कहां टीव्ही के ऍक्टर कर पावोगे”.

हा ‘हासिल’ म्हणजे तोच सिनेमा ज्याचे “आँखे भी होती है दिल की जुबान” हे गाणे आपण ‘हजार’ वेळा तरी गुणगुणले असेल. त्यात अस्सलिखित इलाहाबादी हिंदी बोलत इरफान ने रणविजय सिंह चे पात्र अक्षरशः जिवंत केले. त्याने “क्या बें !”, “क्या बें गुरिल्ला पढें हो ना?” म्हणत त्या खलनायकी भूमिकेला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले की शेवटी त्या सिनेमा मध्ये नायकापेक्षा खलनायकच लोकांना भावला.

पण तो काळच असा होता की प्रचलित बॉलिवूड ची पाळमूळ खूप खोलवर रुजली होती. त्याचा परिणाम म्हणजे चांगला सिनेमा तर बनत होता पण प्रेक्षक भेटत नव्हता. एकदा का जंक फुड खायची सवय लागली की पौष्टिक पदार्थांचे वावडे वाटते. तसेच काही चांगल्या दर्जेदार सिनेमांचे होत होते. पुढे शेक्सपियर च्या ‘मॅकबेथ’ वर आधारित विशाल भारद्वाज ह्यांचा ‘मकबूल’ हा सिनेमा आला आणि त्यात निभावलेली ‘मियां मकबूल’ ची भूमिका इरफान ची सर्वोत्तम भूमिका होती.

पुढे मिरा नायर ह्यांचा ‘नेमसेक’, धुलीया ह्यांचा ‘पान सिंह तोमर’ आणि रितेश बत्रा ह्यांचा ‘लंचबॉक्स’ हे सिनेमे एवढे अप्रतिम होते की ते इरफान च्या करिअर मधले मैलाचे दगड ठरणार होतेच.

पडदा कुठलाही असो, इरफान जेंव्हा पडद्यावर येतो तेंव्हा तो आपल्याला बाकी सगळे विसरायला लावतो. मग तो मिरा नायर ह्यांच्या ‘सलाम बॉम्बे’ मधला दोन मिनिटांचा ‘पत्र लेखक’ असो किंवा मग ‘मुंबई मेरी जान’ मधला ‘थॉमस’. थॉमस ची परिस्थिती फार बेताची. पण त्यालाही आपल्या बायका-पोरांना मॉल मध्ये न्यावेसे वाटते. त्यासाठी वाटेल ते काम तो करतो. त्यात त्याची जी घुसमट होते ती पडद्यावर तंतोतंत फक्त इरफान च उतरवू शकतो. बहुतेक वेळा तो काही न बोलताच त्याच्या डोळ्यांनी बरेच काही बोलून जातो.

इरफान चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त त्याच्या असण्याने बऱ्याच सुमार चित्रपटांचा दर्जा ही उंचावला आहे. तो साध्या व्यावसायिक जाहिरातींमध्ये झळकला तरी लक्ष वेधून घायचा. एक उत्तम कलाकार व सोबतच जीवना कडे पाहण्याचा प्रचंड बुध्दी प्रामाण्यवादी दृष्टिकोन आणि सामाजिक भान असलेला एकमेवाद्वितीय इरफान.

इरफान च्या जाण्याने फारच अस्वस्थ वाटतंय. का माहित का पण कोणीतरी फार जवळचं आपलं गेलंय असे वाटतयं. कदाचित हेच इरफान चे कलाकार म्हणून यश असावे. तो नेहमीच सर्वांना आपलासा वाटला. त्याला आपला निरोप घेता आला नाही ह्याची खंत वाटत असावी  आणि आपल्यालाही त्याचा निरोप घेता आला नाही. आयुष्य हे असेच असते, बरेच काही राहून जाते.

A story of a slap

I remember, it was 8.30 in the morning of the year 2005. That day I had woken up to the loud sound and equally loud cry of my mother. When I heard that sound I hurriedly woken up but could not muster the courage to go into the kitchen and instead stood at the place where I slept on the floor. From the room adjacent to the kitchen (we call it a bedroom) my aunt (My father’s younger sister) came rushing towards the kitchen. As soon as she entered the kitchen I heard another loud sound and cry of my mother. And there I heard my aunt’s intervening sound “Dada, nakaaa !” (Brother, don’t).

After that my father and aunt left the kitchen and went into some other room. At that point I mustered the courage to enter the kitchen and there I found my mother seated in a little space we have in our kitchen. She looked shell-shocked because of what just happened to her. Tears were rolling down her face and at the same time her body was trembling. I went there and stood beside my mother. I wanted to say to her, “nako radu aai” (“Don’t cry mother”) but I couldn’t and just numbly stood there. I also felt like confronting my father and ask him, “how dare you slap my mother?” but I couldn’t. I just numbly stood there.

After some ten minutes of silence my mother started murmuring. I could not make sense of it. Then her voice grew louder and she started crying , “I was sixteen when I came to your house, I was the only girl child of my father, he loved me so much, I did what not for this family, now that your family’s all needs are fulfilled, you are behaving like this, slapping me,”. As she was speaking, her voice was getting louder and louder. “I never thought I will be rewarded like this, after giving so much to this family”, she cried helplessly. And she went on and on till her throat became dry.

Through an act of giving voice to her ordeal, She was literally narrating the whole story of her’s. My maternal grand parents named my mother ‘Maya’ but my paternal grandmother changed it to ‘Nirmala’. How difficult it would have been to her to answer a call for that strange name.

My paternal grand mother used to send my mother to agricultural farm as a labourer. She used to get up at 6 am. As there were no toilet in the house, she had to go outside to attend nature’s call. She would then fetch water from the nearby well. Then she had to wash soiled clothes of all the members of the family. She would then prepare food for the whole family. After packing 2 jowar rotis and any vegetable curry she would go to the farm at around 10-10.30 am to work as a labourer. She would sometimes pluck cotton or uproot groundnut crop among other works. It was very difficult for my mother as she was not accustomed to such kind of drudgery as her father owned many acres of land in her maternal village.

Those who actually work on the field should get the commensurate remunerations. My mother used to work on the farm and when farm owner or ‘muqadam’ used to distribute wages of the day/days, my grand mother used to collect money on behalf of my mother and not a penny was given to her.

As any grand mother, my grand mother was very loving. She used to love me more than her other grand children (I thought so). At the same time she was a feisty woman who used to call the shots at our home. May be she was doing to my mother what her mother-in-law did to her. Their relationship was always adversarial and strange. I sometime wonder, would there be a time when these poor women realise that it is they who are complicit in making the stranglehold of patriarchy stronger around their own necks.

My mother must have felt betrayed when my father slapped her because of some familial quarrels. She must have felt like Amrita when her husband slapped her in the movie Thappad. Though those two instances differ in time, space and reel-real life, trauma and betrayal suffered by those two women are very much alike in a story of a slap which is not just a slap.

They’re already here

I was waiting for my friend Pratik while sitting in a Madras cafe. Pratik is a friend since the school days. He was very good in studies, passionate about science and also curious about socio-political happenings around him. On the other hand, I loved only social science. Cricket and current affairs were the reasons behind our friendship. I remember, he was a very good bowler back then. However absurd it may sound but I never played cricket but I used to discuss it with him. After School, we parted our ways and went on to pursue a degree in our respective areas of interests.

Pratik went to Banglore to pursue a degree in Science and I went to Pune for Political Science. We used to meet at our hometown whenever we were there and would discuss nearly everything under the Sun. Cricket was no more interesting to us but history, politics, science, universe, movies and literature were.

After the post-graduation, Pratik joined one global research organisation in Delhi.  was preparing for National Eligibility Test (NET) so that I could get a job as a Professor. In between a couple of years had passed. I cleared NET and joined one college as an assistant professor. Pratik was so busy in his research that we hardly met and spoke to each other. It had been almost half a year that we did not speak to each other.

But today he contacted me out of nowhere and told me to meet him at our regular place – Madras cafe. He sounded worried so I inquired about his well-being.

“I am fine”, he said

and before I could ask more he hung up the phone.

Finally, my wait is over and Pratik came to the Cafe. He was heavily breathing, looking worried and unusually untidy.

Before I ask anything, he told me, “Not here, come to the corner table”.

We went there and sat.

I asked him, “Where have you been and why are you looking so disturbed?”.

“I was in Delhi and very busy with my research work”,

he paused, looked cautiously around us and continued,

“look, I am here to tell you a very important thing, as you know, my organization researches on extra-terrestrial beings”.

I interrupted him and said, “You mean Aliens? and No ! I don’t know that”.

To which he said, “now I am telling you, listen to me carefully, During my research, I got to know one thing which no sane person would believe”.

I again interrupted and said, “And you want me to believe that thing?. First of all, let me be blunt and tell you with due respect to your research and all that I don’t believe in these ‘Aliens-Filians’. We don’t have any solid proof”.

He lost his cool and said, “what is your problem, here I am trying to tell you something very important and you are blabbering like an ignorant, If you don’t want to listen to me then I am going”.

I sensed the gravity of his talk and tried to calm him down. “Hey look, I am so sorry, please tell me, I will not interrupt you now, You were saying something about Aliens, do you have proof of their existence?. On which planet?”

“The Earth, our very own planet, yes you heard me right, they are already here on our planet and can also come in this cafe”, he said scarily.

“They mean who?” I asked.

“Are you an idiot?, what are we talking? they mean Aliens”.

“Wow, then we should welcome them, and tell me, where have they parked their spaceships?”, I asked.

“They are unlike the one’s which we see in Hollywood sci-fi movies, they are more advanced than that, they have been living here since the time immemorial and the chilling thing is we don’t even know that”, He said.

(In between, a waiter came and we ordered two cups of coffee. )

“What? what proof do you have?”, I said angrily.

“I am the proof”, he said.

“And what does that mean?”, I asked and glanced at him for any sign of madness.

“Look at me, have you ever seen me like this?, the day since I got this information, they have been hounding me and I am afraid, my life is in grave danger. I have got all the information about them which I am going to tell you now. Listen carefully, the Aliens have been here on Earth since the pre-historic times. I have personally identified their paintings drawn by our ancient ancestors in Bhimbetaka caves in Madhya Pradesh. And the most chilling thing is that they can turn into anything and they can ‘almost-exactly’ look like us and now their numbers have increased so drastically that they have planned a sinister mission of destroying the original inhabitants of this planet”

He told me that in one breath and I must admit it was perplexing to me.

I asked, “If they look ‘almost-exactly’ – whatever-that-means – like us then how can we recognize them?”.

“We can recognize them by their green eye colour. To hide that colour they always put on spectacles made up of a special type of transparent glasses”, he said.

“You mean naturally their eye colour is green and when they put on that special type of spectacle their eye colour changes to be normal like us?”, I asked.

“Yes”, he said.

I was numb at that point and wondering how did he get all this information.

He might have sensed my bafflement and continued – “Look, while researching, I did get to read many ancient manuscripts where I stumbled upon the unique manuscript which was written in a symbolic language. After burning a lot of midnight oil, I have de-coded that script and thus got to know about their existence and later about their sinister intentions. I repeat, my life is in grave danger. I know, no one will believe me but you and that’s why I am telling you all this. Take this pen-drive which contains all the necessary information about them. And if anything happens to me then please tell the world about this”.

He was very sad as if he knew that now he cannot escape the inescapable.

As soon as I said, “Don’t worry, nothing will happen to you my friend”, the waiter came with the coffee.

“Hey look, let’s have a coffee now but before that go and freshen up yourself”, I said.

“Yup, I need it badly and I think we are having Anna’s coffee after a long time”, he said and went towards the washroom.

As soon as he left the table, I took out a pen from my pocket and put a couple of drops of colourless liquid into the coffee which he was to consume. After 30 minutes, he was to be alone and eventually was to get a massive Heart-attack.

I took out my phone, switched on the front camera, observed myself in it and removed my spectacles. My green eyes were shining. After a long time, I was taking a selfie without those special glasses and oh my earthly god, I look stunning without those glasses!

Disclaimer – This is improvisation and the plot is familiar and needless to say – not original



PINK – A movie review

CONSENT is a fundamental element of human relations. It is that positive action which makes a range of activities morally right that would otherwise be wrongful. It distinguishes between bondage and employment, borrowing and stealing, permissible sexual relations and rape. As this film deals with the issue of sexual assault (and more actually) so let’s try to put ‘what-is-consent’ in that terminology.

Consent is informed and an affirmative, unequivocal and conscious decision by each participant to engage in mutually agreed-upon sexual activity. Anything but above definition is not a consent for sexual activity and if there is ‘NO’ consent then that activity is considered as a rape. So any non-consensual sexual activity is a rape and ‘Rape’ is a rape irrespective of relation shared between the perpetrator and the victim. Honour and dignity remain with an individual irrespective of marital status. The above sentence is very relevant in the Indian context especially when the debate on ‘Marital Rape’ is going on. So the point is ‘NO’ is ‘NO’ irrespective of marital status.

Some of you must be wondering at this moment that why this writer (self-proclaimed actually) philosophising everything under the Sun but have not written a word about the movie except the title – PINK. First, I apologise to you for putting you through this and come back to writing that part for which you are here.

The film starts with the audio excerpt from the conversation between some women and men hanging out somewhere. They are all laughing and talking until you see the first visual where women & men separate. Women are nervous and they are on the way to their home while Men – equally or more disturbed – land to the hospital to admit one of their friend who has suffered a grievous eye injury. In the next visual, you see the same trio of men with their friend who was not hanging out with them when the incident took place.

Men talk and in between argue about the last night’s incident. Amidst argument one of them boasts – “Mein wahan pe hota na to yeh sab hota hi nahi” (Had I been present there, this would not have happened) and talks of revenge on those women. When one of them disapprove then the revenge-seeking man says – “Bhai hum tradition follow kar rahe hai, jab bandiya jada udane lage na tab unhe unki aukaad dikhani padti hai” (Bro, we are just following tradition. When women steps out of line we must show them their place). The confidence with which they talk of revenge is enough to know that they have the resources and connections to ruin the life of those women assailants.

At the other end, the trio of women wants to forget the last night’s incident. The way they talk about the incident tells us that the last night was a nightmare for them. After a few visuals, we come to know that, all women are independent, working, shares a flat and came to the Delhi for livelihood. They seem helpless and now if that last night’s ghost comes to haunt them, they will be ruined.

The seemingly poor women have no idea what is coming their way. The ghost armed with resources, political connections, latest information technology and the most lethal, the feudal mindset, comes and makes their life as hell. Some of you might charge me of hyperbole but just step into their shoes and imagine the societal reaction when your character being assassinated one way or the other and that too when you are far from your home and family. Women were accused of prostitution and Men were accused of outraging the modesty of a woman. And you wonder who will be convicted? who will come out with his/her head held high from this mud-slinging courtroom trial?

Men’s lawyer (Piyush Mishra) does his job by slanting to the disgustingly low level. He uses all the societal stereotypes about Independent working women (who go to parties, clubs and consume alcohol) to assassinate their character. To which Women’s lawyer (Amitabh Bachchan) counters meekly at the start and as the film progresses, he goes on and on to demolish all the societal stereotypes about Women with his sound logic, reason and superb sarcasm.

Lawyer’s one-upmanship is treat to watch and which makes the PINK, one of the best courtroom trial dramas of recent times. And if we talk about the recent times then it has not been good to some unfortunate women who fell prey to the anachronistic-feudal mindset and to those working women also who have to face and battle out societal stereotypes on a daily basis. The makers of the PINK have tried their best to beat and bury the medieval mindset with the impeccable logic.

After the intense courtroom trial when the justice is finally done, I had gone through the range of emotions and when the closing credit lines start to roll up and I was about to exit the hall, I heard the powerful voice reciting the following lines of Tanvir Gazi –

तू खुद कि खोज मे निकल,

तू किस लिये हताश है?

तू चल, तेरे वजूद कि समय को भी तलाष है

समय को भी तलाष है !

The above thoughtful lines compelled me to stop and listen to the entire poem. And I tell you, I was thrilled to hear those powerful lines and came out of the hall with goosebumps.

Good cinema is a rare these days, so do yourself a favour and watch this fast-paced, intense thriller …

And spread the word !